‘सामाजिक सुसंवाद हे ध्येय एस. एम. नी आयुष्यभर दृष्टीसमोर ठेवले आणि जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा असा सुसंवाद निर्माण करण्यासाठी त्यांनी सुयोग्य आचरणाचा आदर्श समाजासमोर ठेवला. भारतीय समाजाची एकता परस्परातील प्रेमाच्या आणि आपुलकीच्या बंधनांनीच टिकून राहील असा त्यांना विश्वास होता. धार्मिक अथवा सांप्रदायिक दुराग्रहांपासून ते स्वतः तर सदैव दूर राहिलेच पण तरूण पिढीवरही याच सद्भावनेचा वज्रसंस्कार करण्यासाठी त्यांनी आपल्या शक्ति-बुद्धि-वृत्ती पणाला लावल्या. राष्ट्र सेवादलाची संकल्पना साकार करताना त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रतिस्पर्धी करणारी संघटना निर्माण करणे एवढाच उद्देश नव्हता. तर, एकात्म आणि एकसंध नवसमाज निर्माण करण्याच्या आकांक्षाने झपाटलेल्या तरुणांची चमू ठायीठायी उभी राहावी असे तेजस्वी ध्येय त्यांनी आपल्यासमोर ठेवले होते आणि त्याची प्रेरणा इतरांनाही दिली होती.’
हा परिच्छेद आहे, ‘साधना’ने एस. एम. जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्ताने (1 एप्रिल 1993) काढलेल्या सामाजिक सुसंवाद विशेषांकाच्या संपादकीयातील. 1 एप्रिल हा एस. एम. यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने, 40 वर्षांपूर्वी साधना दिवाळी अंक 1983 मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘निधर्मी समाजातील धर्माचे स्थान’ हा लेख ऑडिओ स्वरूपात 'कर्तव्य'वरून प्रसिद्ध करत आहोत. 18 मिनिटांच्या ऑडिओमध्ये या लेखाचे वाचन केले आहे सुहास पाटील यांनी.
सामाजिक सुसंवाद विशेषांक (1 एप्रिल 1993) मधील सर्व लेख वाचण्यासाठी 'साधना'च्या अर्काईव्हला भेट द्या.
Tags: साधना अर्काइव्ह एसेम समाजवाद धर्म आणि राजकारण संस्कृती धार्मिकता सेक्युलरिझम Load More Tags
Add Comment