रंग वसंताचे - भाग 2 

वसंत बापटांच्या निवडक 33 कवितांचे त्यांच्याच आवाजातील सादरीकरण

1922 ते 2002 असे ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभलेल्या वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 जुलै 2021 रोजी सुरु होत आहे. प्रामुख्याने कवी अशी त्यांची ओळख. त्यांनी कवितेमध्ये विविध प्रकार हाताळले. लावणी, पोवाडा, प्रेमकविता, निसर्गकविता, देशभक्तीपर कविता इत्यादी. त्यातील निवडक 33 कवितांचे त्यांच्याच आवाजातील सादरीकरण 1993 मध्ये साधना प्रकाशनाने 'रंग वसंताचे' या शीर्षकाखाली रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्डिंग ऑडिओ कॅसेट्सच्या स्वरुपात दोन भागांत प्रकाशित झाले होते. मात्र या कॅसेट्स आता उपलब्ध नसल्यामुळे त्या सर्व 33 कवितांचे डिजिटायजेशन करून त्या YouTube च्या माध्यमातून कर्तव्य साधनावर दोन भागांमध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यातील 59 मिनिटांच्या या दुसऱ्या भागात एकूण 19 कविता आहेत...

1. ज्ञानेश्वरांना अभिवादन
2. एक पत्र तुकोबारायांना 
3. गुरु 
4. एका कुमारांची कहाणी 
5. मायकेल अँजलोपनिषद  
6. क्षणभर या सौधावर 
7. लावणी लाख बहाण्यांची 
8. जुगारी 
9. शेवटचा सहप्रवास 
10. सावंत 
11. हे कुसुमाग्रज 
12. आंबा पिकतो 
13. तू 
14. तू असतोस तेव्हा 
15. तिची चर्या 
16. जलपरी उसळली वरी 
17. संध्याछाया 
18. माणूस घेता का माणूस 
19. लावणी अखेरच्या विनवणीची 


ऐका रंग वसंताचे - भाग 1

Tags: Weekly Sadhana Kartavya Sadhana Vasant Bapat Marathi Marathi Poems Rang Vasantache Marathi Songs साधना साप्ताहिक कर्तव्य साधना वसंत बापट मराठी मराठी कविता मराठी गाणी रंग वसंताचे Rang Vasantache - Part 2 रंग वसंताचे - भाग 2 Load More Tags

Add Comment