भारतीय संगीताच्या आकाशातील तेजोगोल निखळला

पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीवर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने..

भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रतिभावान गायक पं. कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी उद्या (8 एप्रिल 2023) पासून सुरु होते आहे. 8 एप्रिल 1924 ते 12 जानेवारी 1992 असे 68 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. प्रख्यात कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले साधनाचे भूतपूर्व संपादक वसंत बापट आणि कुमारांचा स्नेहसंबंध होता. त्यामुळे, कुमारांचे निधन झाले तेव्हा साधनाने त्यांना श्रद्धांजली म्हणून 12 पानी विशेषांक काढला होता. तत्पूर्वीही कुमारांच्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली तेव्हा साधनाने त्यांच्यावर गौरव विशेषांक काढलेला होता. या दोन्ही विशेषांकातील निवडक तीन लेख (वसंत बापट, वा. ह. देशपांडे, रामकृष्ण बाक्रे यांचे) कुमारांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने आज व उद्या ऑडिओ स्वरूपात आणत आहोत. मात्र हे दोन्ही संपूर्ण विशेषांक साधनाच्या अर्काइव्हवर उपलब्ध आहेत. या तीनही लेखांचे वाचन सुहास पाटील यांनी केले आहे.


हेही पाहा : 
पं. कुमार गंधर्व गौरव विशेषांक : 05 एप्रिल 1984

कुमार गंधर्वांना श्रद्धांजली (पुरवणी अंक) : 18 जानेवारी 1992
 

Tags: indian classical vocal kumargandhrva birth centenary कुमार गंधर्व जन्मशताब्दी भारतीय शास्त्रीय संगीत उत्तर हिंदुस्थानी संगीत वसंत बापट स्मृतीलेख Load More Tags

Comments:

ARUN MADHUSUDAN KANETKAR

अप्रतिम लेख,,! कुमारांच्या अंतरंगातील सांगिताला पूर्ण न्याय देणारी शब्दरचना , त्यांचे व्यक्तिमत्व उजळून टाकते.

Dr.Yashwant k.Ranshevre

Excellently explained biography of Kumar ji

Sanjeev Kusurkar

उत्तम सादरीकरण,लेख उत्कृष्ट आहेच पण त्याचे वाचनही तितकेच प्रभावी!

देवीदास वडगांवकर वकील

छान.आवाज छान.धीरगंभीर.

Add Comment