सांगली (महाराष्ट्र) ते फ्लोरिडा (अमेरिका) व्हाया मुंबई

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांच्या प्रवर्तकाची मुलाखत : पूर्वार्ध

1970च्या दरम्यान म्हणजे 50 वर्षांपूर्वी जे महाराष्ट्रीय तरुण अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी कर्तृत्व गाजवले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुनील देशमुख. त्यांनी विशेष पुढाकार घेतला आणि मग महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान केले जाऊ लागले. दर वर्षी दहा ते अकरा याप्रमाणे मागील 28 वर्षे ते पुरस्कार न चुकता दिले जात आहेत. त्या पुरस्कारांना 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांची मुलाखत 'साप्ताहिक सकाळ'चे माजी संपादक सदा डुम्बरे आणि 'साप्ताहिक साधना'चे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ या दोघांनी घेतली होती. जानेवारी 2019 मध्ये घेतलेली ती मुलाखत एक तासाची आहे. मुलाखतीच्या पूर्वार्धात सुनील देशमुख यांनी व्यक्तिगत जडणघडण व जीवनप्रवास यावर ओझरता दृष्टिक्षेप टाकला आहे. तर मुलाखतीच्या उत्तरार्धात 'महाराष्ट्र फाउंडेशन'चे पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका व पुरस्कारांची कार्यवाही प्रक्रिया यांचा थोडक्यात वेध घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी घेतलेली ही मुलाखत आता प्रसिद्ध करण्याचे कारण, उद्या (10 जानेवारी 2022 रोजी) गेल्या वर्षासाठी निवड झालेल्या 11 पुरस्कारांची घोषणा होणार आहे. त्या पुरस्कारांचे महत्त्व नेमके किती व का आहे, हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत पाहायला / ऐकायला हवी..!

Tags: maharashtra foundation sada dumbare vinod shirsath sunil deshmukh सुनील देशमुख विनोद शिरसाठ सदा डुंबरे मुलाखत महाराष्ट्र फाउंडेशन Load More Tags

Comments: Show All Comments

हिरा जनार्दन

नतमस्तक!

डॉ अशोक बेलखोडे

प्रेरणादायी मुलाखत....

Avinash Yamgar

अतिशय आनंद दायी आणि उद्बोधक मुलाखत... धन्यवाद

Shamsuddin

ही छान मुलाखत ऐकायची राहून गेली होती. पुन्हा प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद!

Changdeo Kale

प्रवास सगळेच करतात परंतु लक्षात राहतो तो वेगळेपण जपणारा प्रवास. भले ती पाऊलवाट असेल पण ती स्वतः निर्माण केलेली असते. सुनीलराव हे त्यापैकी एक होत. पुरस्कार देण्यामागे असलेला द्रुष्टिकोन आणि त्यासाठी घेण्यात येत असलेली चौफेर दक्षता, यामुळे या उपक्रमाने निश्चितच स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. ज्यांना हे पुरस्कार जाहीर होतात त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव तर यामुळे होतोच परंतु त्याचवेळी त्यांच्या विषयीचा आदरही द्विगुणित होतो. सुनीलराव यांच्या या स्तुत्य उपक्रमास वंदन!

Vidyut bhagwat खूप महत्त्वाचेच

खूप आनंद झालाय हे ऐकल्यावर

Kiran Yele

आदरणीय श्री सुनील सरांचे विचार आण कृती यात अंतर नाही. इतक्या मोठ्या पदाची आणि पैशाची साय नाकारणे आणि परिवर्तनाची कास धरणे हेे उदाहरण अद्भुत आहे. सुनीलसरांचे गेली अनेक वर्षे चाललेले हे कार्य सामाजिक चळवळी संपल्या नाहीत याचे द्योतक आहे. सुनील देशमुख सरांस आणि त्यांच्या समुहास सलाम. आपला किरण येले

Add Comment

संबंधित लेख