1970च्या दरम्यान म्हणजे 50 वर्षांपूर्वी जे महाराष्ट्रीय तरुण अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी कर्तृत्व गाजवले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुनील देशमुख. त्यांनी विशेष पुढाकार घेतला आणि मग महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान केले जाऊ लागले. दर वर्षी दहा ते अकरा याप्रमाणे मागील 28 वर्षे ते पुरस्कार न चुकता दिले जात आहेत. त्या पुरस्कारांना 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांची मुलाखत 'साप्ताहिक सकाळ'चे माजी संपादक सदा डुम्बरे आणि 'साप्ताहिक साधना'चे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ या दोघांनी घेतली होती. जानेवारी 2019 मध्ये घेतलेली ती मुलाखत एक तासाची आहे. मुलाखतीच्या पूर्वार्धात सुनील देशमुख यांनी व्यक्तिगत जडणघडण व जीवनप्रवास यावर ओझरता दृष्टिक्षेप टाकला आहे. तर मुलाखतीच्या उत्तरार्धात 'महाराष्ट्र फाउंडेशन'चे पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका व पुरस्कारांची कार्यवाही प्रक्रिया यांचा थोडक्यात वेध घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी घेतलेली ही मुलाखत आता प्रसिद्ध करण्याचे कारण, आज (10 जानेवारी 2022 रोजी) गेल्या वर्षासाठी निवड झालेल्या 11 पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्या पुरस्कारांचे महत्त्व नेमके किती व का आहे, हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत पाहायला / ऐकायला हवी..!
Tags: sada dumbare vinod shirsath sunil deshmukh सुनील देशमुख विनोद शिरसाठ सदा डुंबरे मुलाखत महाराष्ट्र फाउंडेशन Load More Tags
Add Comment