आपले पर्यावरण, आपली पृथ्वी आणि आपण

जागतिक वसुंधरा दिनाच्या (22 एप्रिल) निमित्ताने

आपल्या आजूबाजूच्या जगात सूक्ष्मजीवांपासून ते अंतराळातल्या ग्रहगोलांपर्यंत सर्वत्र सतत काहीतरी घडत असतं. ते कसं घडतं? का घडतं? ते आपल्याला कसं समजतं? आपण त्याचा कसा विचार करतो? या आणि अशा काही मूलभूत प्रश्नांची सोपेपणाने उकल करणारी लेखिका – मृणालिनी वनारसे. निसर्ग, पर्यावरण, संस्कृत, संस्कृती, भूगोल, पुरातत्त्वशस्त्र, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा तिचा अभ्यास आहे. 

वेगवेगळ्या ठिकाणची भूमी, पाणी, परिसंस्था, निसर्ग आणि माणूस यांचा संकलित अभ्यास तिने केला. वेगवेगळ्या ठिकाणी कशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नैसर्गिक प्रक्रिया घडतात, परिसंस्था काम कशा करतात, तिथलं मानवी अस्तित्व कसं विकसित होत गेलं, त्याचा परिसंस्थेवर कसा प्रभाव पडला, हे प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन पाहिलं. तिथले आजचे प्रश्न पहिले. विशेषतः ओढे, तलाव, नद्या अशा वेगवेगळ्या जलाशयांच्या परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवून, जलाशयांची परिसंस्था सुधारण्यासाठी प्रत्यक्षात स्थानिक लोकांना काय करता येईल याचा अभ्यास करून त्यांना योग्य त्या सूचना केल्या. आणि तेव्हाच परिसरशिक्षणाच्या संदर्भात स्थानिक शाळा आणि मुलं यांच्यासोबतसुद्धा अनेक प्रकारे काम केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आणि भारताच्या अनेक दुर्गम भागांत ती अशा कामासाठी फिरली. त्या काळात सतत अनुभवातून शिकत आणि शिकवत राहिली.

सध्या कुमार ते तरुण वयात असलेल्यांसाठी, म्हणजेच जेन झी साठी, ती ज्ञानरंजन (infotainment) प्रकारात मोडणाऱ्या कथा-कादंबऱ्या लिहिते. विषय शिकायची गोडी लागेल अशी पाठ्यपुस्तकं लिहिते. लहान मुलांपासून ते विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर उपयोगी पडतील असे वेगवेगळ्या विषयांचा एकमेकांशी संबंध जोडून सर्वंकष विचार करायला शिकवणारे (interdisciplinary) अभ्यासक्रम तिने आखले आहेत. तिचं हे विशेष काम जाणून घेण्यासाठी तिच्याशी ऋचा मुळे यांनी संवाद साधला. ही मुलाखत शब्दांकन करून कर्तव्यवर प्रसिद्ध झालेली आहे.
(वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

या मुलाखतीतील पर्यावरणविषयक निवडक अंश ऑडिओ स्वरूपात आज 22 एप्रिल म्हणजेच जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
 

Tags: mrinalini mrinalini vanarase ecology ecological philosophy environmental philosophy environmental restoration पर्यावरण पर्यावरणीय पुनर्रचना घाटमाथा प्रतीक प्रश्नांचा दिवस वर्ल्ड अर्थ डे जागतिक वसुंधरा दिवस world earth day ecological balance environmentalist environmental education for children प्रयावर्ण शिक्षण शालेय शिक्षण आदिवासी परिसर परिसंस्था ecosystem Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/