ऑडिओ : कच्च्या कैऱ्या - विभूतीभूषण बंद्योपाध्याय

'मुलांसाठी पथेर पांचाली' हे पुस्तक आता स्टोरीटेलवर उपलब्ध

'पथेर पांचाली' ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942मध्ये काढली, तिला त्यांनी 'आंब्याच्या कोयीची पुंगी' असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले; त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली, की त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा तीच कथा निवडली. 1955मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतही 'माईलस्टोन' ठरला. परिणामी 'पथेर पांचाली' ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये ती प्रथमच आली आहे, तिचा अनुवाद केला आहे विजय पाडळकर यांनी... सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ मराठी आवृत्तीसाठी कायम ठेवले आहे.

मुद्रित आवृत्तीसोबतच ही कादंबरी ई-बुक स्वरूपात Kindleवर उपलब्ध आहे..आणि ऑडिओबुकच्या स्वरुपात Storytelवर आली आहे. दिपाली अवकाळे यांनी या कादंबरीचे वाचन केले आहे आणि यातील संगीत दिले आहे रिजू बॅनर्जी या दहा वर्षांच्या मुलाने. त्यातील साडेसात मिनिटांची ही दुसरी कथा. एकूण तीन तासांचे हे संपूर्ण पुस्तक ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytelचे Subscription आवश्यक आहे.


साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटवर ही कथा आपल्याला वाचता येईल..

Tags: बंगाली साहित्य कथा बालसाहित्य ज्ञानपीठ सत्यजित राय Load More Tags

Comments:

Anonymous

khup chaan story ani changla awaj aahe. story aiktana chaan watat hote. Dhanyawad.

Add Comment