आमची लांची

बाभळीच्या बाया : झरी - जामणी तालुक्यात : भाग 18/19

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग येथे ऐकता येईल.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. या मालिकेतील सर्व भाग एकापाठोपाठ एक येथे ऐकता येतील.

आज त्याचा अठरावा भाग प्रसिद्ध करत आहोत.
प्रकरण सतरावे - आमची लांची (24 मिनिटांचा ऑडिओ)
लांची ही गावात वेडसर म्हणून हिणवली जात असलेली एक मुलगी. ती मनोरुग्ण आहे, तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झालेला आहे, तिला स्वतःच्यासहरीरचे,कपड्यांचे भान राहत नाही, कुटुंब असूनही बेघर असल्यासारखी भणंग अवस्था तिची होती. तिला लेखिकेने आणि तिच्या बायांनी कशी मदत केली त्याची हृद्य कहाणी यात आहे. त्यानिमित्ताने काही सामाजिक आरोग्यविषयक प्रश्नांची चिकित्साही यात केलेली आहे.

Tags: वनश्री वनकर गौरी देशपांडे झरी-जामणी पीडिता यवतमाळ सीएसआर बाभळीच्या बाया बाया मानसिक आरोग्य मनोरुग्ण बलात्कार बेघर स्त्रिया स्त्रीवाद सपोर्ट ग्रुप एकमेका सहाय्य करू Load More Tags

Add Comment