गृहपाठ

बाभळीच्या बाया : झरी - जामणी तालुक्यात : भाग 17/19

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.

या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.

हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग येथे ऐकता येईल.

2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. या मालिकेतील सर्व भाग एकापाठोपाठ एक येथे ऐकता येतील.

आज त्याचा सतरावा भाग प्रसिद्ध करत आहोत.
प्रकरण सोळावे - गृहपाठ (21 मिनिटांचा ऑडिओ)
स्त्रियांचे लैंगिक सुख हा शहरी आणि तुलनेने मोकळे वातावरण असलेल्या सामाजिक वर्तुळातलाही तसा दबक्या आवाजात बोलायचाच मुद्दा राहिलेला आहे. विवाहित स्त्रियांच्या बाबतीतही तो पुरेशा मोकळेपणाने बोलला जात नाही. हस्तमैथुनासारख्या बाबतींत तर अनुभवी स्त्रियांनाही फारशी माहिती नसते. शिक्षण नसते. लेखिकेने प्रशिक्षणात या संदर्भात दिलेला एक विलक्षण गृहपाठ आणि अनुभव या प्रकरणात आहे.

Tags: लैंगिक सुख हस्तमैथुन गृहपाठ स्त्रीवाद स्त्रियांची लैंगिक भावना झरी- जामणी यवतमाळ सीएसआर समाजकार्य स्त्रियांच्या समस्या कुटुंब स्त्री महिला Load More Tags

Add Comment