महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.
या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.
हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग ऐकता येईल.
2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. आज त्याचा सातवा भाग प्रसिद्ध करत आहोत.
प्रकरण दहावे - गीताताई
गीताताईच्या रूपात आपल्याला भेटते दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकलेली स्त्री. कष्ट, कुपोषण, दोन वेळच्या जेवणाचे हाल, अंगावर धड कपडा असण्याची मारामार आणि त्यामुळे बौद्धिक आणि मानसिक कुवतीवर होत असलेले दुष्परिणाम या सर्वांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गीताताई. लेखिकेने त्यांना समजून घेऊन, प्रोत्साहन देऊन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊन गीताताईसाठी सहकाऱ्यांची सपोर्ट सिस्टिम लेखिकेने उभी केली. आणि बायांनी एकमेकींना नावं न ठेवता समजून घ्यावं आणि एकमेकींचा आधार व्हावं याचा पायंडा पाडला. त्याचा हा मागोवा आहे.
हा 17 मिनिटांचा ऑडिओ आहे.
Tags: बाया दारिद्र्य दुष्टचक्र कुपोषण बौद्धिक कुपोषण मानसिक कुचंबणा झरी-जामणी यवतमाळ CSR वनश्री वनकर गौरी देशपांडे साधना डिजिटल शिक्षण स्त्री शिक्षण सपोर्ट ग्रुप सपोर्ट सिस्टिम स्त्री आधार बचत गट Load More Tags
Add Comment