(अरुणा रॉय लिखित 'The RTI Story' या पुस्तकाच्या अनुवादाचे प्रकाशन 12 जानेवारी 2020 रोजी पत्रकार भवन, पुणे येथे झाले. 'कहाणी माहिती अधिकाराची' या नावाने हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. प्रकाशन समारंभात अनुवादक अवधूत डोंगरे यांनी केलेले हे भाषण.)
नमस्कार,
एखाद्या कामामागचा हेतू चांगला आहे किंवा ते वरकरणी समाजासाठी आहे, अशी कारणं देऊन आपल्याकडे अव्यावसायिक वागण्याचं समर्थन अनेकदा केलं जातं. साधनेच्या कामाची धाटणी बघितली तर त्यांना अशी समर्थनं देता येऊ शकतात, पण साधनाच्या बाबतीत आणि श्री. विनोद शिरसाठ यांच्या बाबतीत मला चांगल्या अर्थाने उलटा अनुभव आला. तसा तो आधीही आलेला आहे. व्यावसायिक म्हणजे आर्थिक अर्थानेही आणि कामाची प्रतिष्ठा जपण्याच्याही अर्थाने. त्यामुळे मीही दोन्ही अर्थांनी समाधानाने हे काम केलेलं आहे. प्रत्यक्ष कामाचा दर्जाही समाधानकारक आहे का, हे आता वाचकांना ठरवता येईल.
तर, हमारे आज के मेहमान अरुणा रॉय जी और निखिल डे जी शायद मराठी नहीं जानते होंगे, म्हणून इंग्रजी-मराठी असं मिश्र भाषेत थोडंसं बोलतो.
We are living in an era, where willingly or unwillingly (and knowingly / unknowingly) we keep surrendering our information to some corporate companies that control much of the internet, social media, mobile phone networks and in a way our minds. They constantly want us to stay updated. We are bombarded with advertisements of newer versions of smart phones. But, we know that words like update and smart are outright deceptive (generally also and in this specific context also). They actually mean that the phone is smart enough to grab our information and keep the companies updated about the consumer who is holding the phone. The same logic applies to the governments of our era. They want information that ranges from our retinas to what not. They want us to be transparent about our information and, as we are witnessing now with National Register of Citizens and Citizenship Amendment Act, they want us to be constantly on an alert mode, so that they can hold us accountable for a thing as primary as citizenship.
थोडक्यात, ग्राहक आणि नागरिक म्हणून आपल्याकडून सातत्याने माहितीची मागणी केली जाते, आपल्या माहितीचा गैरवापरही होतो, त्यातून आपलं नियंत्रणही केलं जातं, पण त्याबद्दल आपल्याला काही कारणं दिली जातच नाही, उलट यातून आपलं सबलीकरण होतंय असं भासवलं जातं. मोबाइल फोनच्या कंपन्या अपडेट, स्मार्ट असे शब्द वापरतात; तर सरकार सुरक्षितता, सरकारी योजनांचा लाभ, राष्ट्रभक्ती असे शब्द वापरतं. या पार्श्वभूमीवर आपण हे पुस्तक वाचतो.
Rural India has very strong and intense presence in this book. The people collectively demand transparency and accountability in the functioning of government; they ask for free flow of information. In the mainstream narrative, sadly, the rural space is not equated with smartness and being updated, but ironically here we find rural people who want to update all of us as citizens.
दुर्दैवाने आपल्याकडे गावठी, गावंढळ, हे शब्द, किंवा हिंदीतही देहातीसारखे शब्द स्मार्टच्या विरुद्धार्थी वापरले जातात. पण या पुस्तकात गावातली ही माणसं एकत्र येऊन सरकारी यंत्रणेने पारदर्शक असण्याची, उत्तरदायी असण्याची मागणी करतात. आपण- म्हणजे सर्वसामान्य लोकांनीही सरकारी कामकाजाविषयी अपडेट असायला हवं, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. तर, गावांकडे आपण ज्या संकुचित चष्म्यातून बघतो, त्याची मर्यादा या निमित्ताने अधोरेखित होते. अर्थातच वास्तव एकरंगी नसतं, त्यामुळे गावांच्या मर्यादाही असतात; त्याचेही संकेत या पुस्तकातून मिळत राहातात.
शिवाय, आपल्याकडे बुद्धिजीवी आणि श्रमजीवी असेही दोन शब्द वापरले जातात. दुर्दैवाने याही शब्दांचा वापर त्यांचे साचे असल्याप्रमाणे होताना दिसतो. हे शब्द ‘बायनरी’त वापरले जातात. त्याच्या खोलात आत्ता जाता येणार नाही. पण श्रमजीवी मानला जाणारा अवकाशही बुद्धी वापरत असतो, उलट जगण्याशी जास्त जवळच्या मुद्द्यांवर त्यांना बुद्धी खर्च करावी लागते, त्यातूनच लोककथा, लोकगीतं, इत्यादी पारंपरिक कथनं निर्माण होतात, हे आपण जाणतो. तर, माहितीच्या अधिकार कायद्यामागची बुद्धी या श्रमजीवी घटकांमधून कशी समोर आली, आणि या ग्रामीण श्रमजीवी अवकाशाशी शहरी अवकाशातल्या काहींचं नातं कसं जोडलं गेलं, त्यांच्या परस्पर देवाणघेवाणीतून या कायद्याने कसा आकार घेतला, याची कहाणी या पुस्तकातून उलगडते. त्यामुळेच त्यात काही चमकदार लोककथा इत्यादींनाही मोकळ्याने जागा करून दिलेली आहे, पारंपरिक कथनांमधली उपजत शहाणीवही लोकशाहीच्या संदर्भात कशी प्रस्तुत ठरते, हेही यात उलगडतं. तर, हे यातलं दुसरं वेगळं सूत्र दिसतं की, श्रमजीवी अवकाशात बुद्धीचा वापर होत असतो, त्यातल्या पारंपरिक ज्ञानालाही स्मार्ट व अपडेट अशा शब्दांशी जोडलं जात नसलं, तरी लोकशाहीच्या संदर्भात हे पारंपरिक ज्ञान आणि समज महत्त्वाची असते, हे इथे अधोरेखित होते.
तर, अशा पुस्तकाच्या भाषांतराची संधी दिल्याबद्दल साधनेचे व श्री. शिरसाठ यांचे पुन्हा आभार मानतो आणि थांबतो.
- अवधूत डोंगरे
dongareavadhoot@gmail.com
Amazon वर हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रकाशन समारंभाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: The RTI Story Aruna Roy Translation अनुवाद अरुणा रॉय माहिती अधिकार कायदा पुस्तक साधना प्रकाशन भाषण speech Load More Tags
Add Comment