स्वतंत्र लेखन व अनुवाद या दोन्हीसाठी अवधूत डोंगरे या तरुण लेखकाची ओळख आहे. चार-पाच छोट्या पण वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या आणि दहा-बारा मोठी व विशेष महत्त्वाची अनुवादित पुस्तके त्याच्या नावावर आहेत. त्याच्या एका कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. त्याचे हे कार्यकर्तृत्व गेल्या दशकभरातील आहे. त्याची ही कारकीर्द सुरू होण्यापूर्वी म्हणजे, 2008 पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये तो पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना त्याने कुमार वयोगटातील मुलाच्या नजरेतून आठ-नऊ गोष्टी लिहिल्या. भाषा, शैली, मांडणी या तिन्ही दृष्टीने या गोष्टी आगळ्यावेगळ्या ठरतात. म्हणून त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये या सर्व गोष्टींचे संकलन असलेले छोटे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले. अर्थातच चोखंदळ वाचकांनी त्याची चांगलीच दखल घेतली. आणि गेल्या वर्षी 'साधना'ने आपली निवडक पुस्तके ऑडिओ बुक्स करायला घेतली तेव्हा, या पुस्तकाचे ऑडिओ बुक करायला मला आवडेल असे रीमा अमरापूरकर यांनी स्वतःहून सांगितले. आता ते ऑडिओ बुक तयार झाले आहे, स्टोरीटेलवर उपलब्ध करून दिले आहे. मात्र त्या सर्वच गोष्टी लहान थोरांनाही ऐकायला आवडतील आणि त्यांनी त्या ऐकाव्यातच अशा आहेत. म्हणून कर्तव्यवरून दर सोमवारी एक या प्रमाणे नऊ आठवड्यांत सादर करीत आहोत.
40 मिनिटांचे हे संपूर्ण ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा : ‘शेंदूर’वर आधारित लघुपट करताना
Tags: marathi audiobooks reema lagoo avdhoot dongare short stories मुलांसाठी साहित्य Load More Tags
Add Comment