ऑडिओ - माझी काटेमुंढरीची शाळा या कादंबरीतील एक प्रकरण

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 3

गो. ना. मुनघाटे हे गडचिरोली जिल्ह्यातील एक ध्येयवादी शिक्षक. माडिया गोंड आदिवासींचा हा प्रांत. नक्षलवादी चळवळीचा प्रदेश म्हणून सर्वपरिचित. परंतु मुनघाटे गुरुजींनी आयुष्यातील दोन दशके त्या दुर्गम आदिवासी खेड्यात शिक्षणसेवा करण्यात घालवली. त्यांच्यात राहून एक स्थायी स्वरूपाचे काम उभे केले. तिथला आदिवासी, त्यांची कधी शाळेला येणारी- कधी न येणारी लेकरं, आदिवासींचं जल-जंगल-जमीन, नक्षलवाद आणि आदिवासींची संस्कृती या सर्वांमध्ये टिकून राहून तिथली शाळा टिकवणारे हे मास्तर. ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ही त्यांची आत्मवृत्तात्मक कादंबरी. साधना प्रकाशनाचे हे पुस्तक ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्याचे वाचन केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार राजकुमार तांगडे यांनी. या पुस्तकातील हे नऊ मिनिटांचे प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. पावणेचार तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक माझी काटेमुंढरीची शाळा गो. ना. मुनघाटे राजकुमार तांगडे स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Mazi Katemundharichi Shala G. N. Munghate Rajkumar Tangde Load More Tags

Comments:

Chintaram Kumare

Nice

Add Comment