आचार्य जावडेकर, पु. ल. देशपांडे आणि दि. बा. मोकाशी

असेही विद्वान (भाग 3/20)

मराठीतील महत्त्वाच्या नियतकालिकांचे संपादक, साहित्याचे समीक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे भाष्यकार अशी ओळख असलेल्या प्रभाकर पाध्ये (1909 ते 1984) यांचे असेही विद्वान हे पुस्तक आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाले आहे. त्यासाठी वाचन केले आहे गजानन परांजपे यांनी.. हे एकूण 20 ऑडिओज् आठवड्यातून दोन याप्रमाणे कर्तव्यवर प्रसिद्ध करत आहोत. प्रत्येक ऑडिओ 10 ते 20 मिनिटांच्या दरम्यान असून त्यात दोन किंवा तीन विद्वानांविषयीचे प्रसंग आहेत. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकात एकूण 75 लेखांचे भारतातील विद्वान (33), आशियायी विद्वान (20) व पाश्चात्त्य विद्वान (22) असे तीन विभाग केले आहेत. क्रमवारी लावताना मात्र तसा काहीही विचार केलेला नाही. कारण या आठवणी इतक्या विविध प्रकारच्या आहेत की, त्या सर्व काहीएक सूत्रात पकडता येणे अवघड आहे. विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग ऐकताना त्या-त्या विद्वानांविषयी असलेले गूढ कमी होईल; या विद्वान व्यक्तीसुद्धा मानवी भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असे असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देता आले याची जाणीव होऊन आपल्या मनातील या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल!


हे पुस्तक छापील किंवा इ-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.  

 

Tags: marathi audio book prabhakar padhye gajanan Paranjape asehi vidwan sadhana prakashan sankalp gurjar Load More Tags

Add Comment