हमीद दलवाईंचा ट्रेलर: अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट

दलवाईंच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त...

29 सप्टेंबर 1932 ते 3 मे 1977 असे जेमतेम 45 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या हमीद दलवाई यांचा उद्या 43 वा स्मृतिदिन. जसजसा काळ पुढे जातो आहे, तसतसे हमीद दलवाई अधिकाधिक प्रस्तुत ठरत आहेत. त्यांचे जीवन व कार्य यावर दृष्टीक्षेप टाकला तर, कलात्मक व व्यावसायिक या दोन्ही दृष्टींनी तुफान चालू शकेल असा एक चित्रपट तयार होऊ शकेल. मात्र त्यांचे छोटेखानी चरित्रही अद्याप आलेले नाही. तशा चरित्राची गरज काही अंशी भागवणारे आणि तसे विस्तृत चरित्र लिहिण्याची गरज अधोरेखित करणारे एक पुस्तक आहे: अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट, त्याची ओळख करून देणारा हा तीन मिनिटांचा व्हिडिओ.

Tags: मुस्लीम अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट मुस्लीम सुधारणा पुस्तक व्हिडीओ स्मृतिदिन मुस्लीम सत्यशोधक मंडळ Load More Tags

Comments:

Pravin

Khup chhan information

Ramesh Donde

I am not in my residence. Will ask for a copy once Corona problem is over and I return to my home.

मंजिरी देशमुख

मुस्लिमांसाठी सुधारणा करणारे हमीद भाई ह्यांना मानचा मुजरा!! पण आजच्या काळातील प्रत्येकालाच ह्याच्यां कायाॅचा परिचय आहे का? त्यांच्यावर चित्रपट काढून तळागाळातील मुसलमानांपयॅंत त्यांचे विचार गेले पाहीजेत... तरच मुसल-मन बदलू शकेल मंजिरी देशमुख

संजय मेश्राम

अगदी अल्प आयुष्य लाभूनही समाजासाठी मोठे कार्य करणाऱ्या मानवतेच्या या थोर सुपुत्रास अभिवादन। आपले कार्य कायम प्रेरणादायी ठरेल।

Add Comment