तसं म्हणायला गेलं तर, हमीद दलवाई हे मागच्या पिढीचे कथाकार. त्यांच्या कथांमध्ये निम्नमध्यमवर्गीय संस्कार असलेली मुस्लिम कुटुंबे दिसतात, कोकणामधील आर्थिक, सामाजिक प्रश्न दिसतात. दलवाईंच्या अगदी सुरवातीच्या काळातील कथांमधूनही त्यांचं तीव्र सामाजिक भान दिसून येतं. 'दहा रुपयाची नोट' या कथेमधूनही हे भान दिसून येतं.
अनेक नियतकालिकांमध्ये विखुरलेल्या दलवाईंच्या काही कथा संकलित करून साधना प्रकाशनाने 'जमीला जावद आणि इतर कथा' हा कथासंग्रह मे 2016 रोजी प्रकाशित केला. याच पुस्तकात 'दहा रुपयांची नोट' या कथेचाही समावेश आहे. 'दहा रुपयांची नोट' या कथेचे वैशिष्ट्य असं की, ही कथा लिहिली तेव्हा हमीद दलवाई अवघ्या वीस वर्षांचे होते.
हमीद दलवाई यांच्या जयंतीनिमित्त 'दहा रुपयांची नोट' ही कथा ऑडिओरुपात आणत आहोत. या कथेचं अभिवाचन केलंय वंदना बोकील-कुलकर्णी यांनी..
'जमीला जावद' हा कथासंग्रह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: katha jamila jawad audio story हमीद दलवाई कथा जमिला जावद ऑडिओ Load More Tags
Add Comment