‘दिशा स्वराज्याची’ या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर यांची मुलाखत

गडचिरोलीतील मेंढा लेखा या गावाच्या स्वराज्याच्या प्रयोगाविषयीची ही डॉक्युमेंटरी आहे..

‘दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला मेंढा लेखा हे गाव माहीत झाले. गावकऱ्यांना वनाधिकार मिळवून देणारे भारतातील पहिले गाव अशी त्याची ओळख आहे. आणि अर्थातच मागील तीन दशकांत या गावाने स्वतःशी आणि सरकारशी बराच संघर्ष केला आहे.

या गावात राजकारण नाही, पण या गावाने केलेला प्रयोग राजकीयच आहे. त्या संपूर्ण प्रयोगाची हकिकत सांगणारे अभ्यासपूर्ण व वाचायला ललितरम्य असे ‘गोष्ट मेंढा गावाची’ हे पुस्तक, आजचे मराठीतील आघाडीचे लेखक मिलिंद बोकील यांनी 2012 मध्ये लिहिले आहे. त्यामुळे या गावाविषयी अनेक लहान थोरांच्या मनात बरेच कुतूहल आहे. मात्र हे गाव पाहिलेल्या लोकांची संख्या अत्यल्प आहे.

आता ते कुतूहल काही प्रमाणात शमवणारी आणि बऱ्याच प्रमाणात वाढवणारी, ‘दिशा स्वराज्याची’ ही 53 मिनिटांची डॉक्युमेंटरी नुकतीच आली आहे. तिचे दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर यांच्या विनोद शिरसाठ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक तासाचा व्हिडिओ..

ही संपूर्ण मुलाखत साधना साप्ताहिकाच्या 24 फेब्रुवारी 2024 च्या अंकात वाचता येणार आहे..


हेही वाचा : 

 

Tags: mendha lekha milind bokil devaji tofa gadchiroli tribal forest Load More Tags

Add Comment

संबंधित लेख