‘श्यामची आई’मध्ये छोटा श्याम साकारताना...

शर्व गाडगीळ याची मुलाखत | संवादक : कृतार्थ शेवगावकर

साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकावर आधारित आणि सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा नवा मराठी चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने, साधना प्रकाशनाने या चित्रपटातील 35 छायाचित्रे पुस्तकातील त्या त्या प्रसंगांच्या ठिकाणी वापरून 'श्यामची आई'ची विशेष आवृत्ती प्रकाशित केली. त्या आवृत्तीचे प्रकाशन आणि नव्या चित्रपटातील कलाकारांची संवाद असा कार्यक्रमदेखील टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे 3 नोव्हेंबरला पार पडला. 

त्याचप्रमाणे, 'साधना'च्या युवा दिवाळी अंकात, श्यामच्या आईची भूमिका करणाऱ्या गौरी देशपांडे या अभिनेत्रीची दीर्घ मुलाखत प्रसिध्द झाली आहे. आणि  साधनाच्या मुख्य दिवाळी अंकामध्ये या चित्रपटाशी संबंधित तिघांच्या तीन स्वतंत्र  मुलाखतींचा एक विभाग केलेला आहे. त्यामध्ये आहेत, या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके, पटकथा लेखक सुनील सुकथनकर आणि चित्रपटामध्ये छोट्या श्यामची भूमिका करणारा शर्व गाडगीळ. या तिन्ही मुलाखती मुळात व्हिडिओ स्वरूपात घेतल्या गेल्या आणि नंतर त्यांचे शब्दांकन करून त्या यंदाच्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या. 'कर्तव्य साधना'वरून या तीनही मुलाखतींचे व्हिडिओज् येत्या तीन दिवसांत प्रसिद्ध करत आहोत. गौरीची मुलाखत मात्र ऑडिओ स्वरुपात घेतली गेली आहे, यथावकाश तो ऑडिओसुद्धा कर्तव्यवरून प्रसिद्ध करणार आहोत. 

आज सादर करीत आहोत, शर्व गाडगीळ याची मुलाखत. त्याची एकंदर जडणघडण, त्याचे कुटुंब व शाळा, श्यामची आई या चित्रपटामध्ये छोटा श्याम साकारण्याचा त्याचा अनुभव, त्या भूमिकेसाठी केलेली तयारी आणि त्याला उलगडलेला श्याम अशा विषयांवर त्याच्याशी संवाद साधला आहे कृतार्थ शेवगावकर यांनी.


 

Tags: shyamchi aai sane guruji sharva gadgil interview new film marathi films साने गुरुजी मुलाखत श्यामची आई शर्व गाडगीळ साधना दिवाळी अंक Load More Tags

Add Comment