कर्तव्य पॉडकास्ट : गेम्सच्या माध्यमातून शिक्षणात रुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला!

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते उमेश खोसे यांच्याशी संवाद

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा इथल्या जि. प. प्राथमिक शाळेत शिकवणारे उमेश रघुनाथ खोसे यांना यंदाचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी त्यांनी 51 ऑफलाइन अ‍ॅप्सची निर्मिती केली आहे. पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन डिजीटल डिव्हाइड भरून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. या तांड्यावरील मुलांना त्यांच्या बंजारा बोली भाषेत, त्यांना समजेल असे इयत्ता पहिलीचे पुस्तक त्यांनी अनुवादितही केले आहे. त्यांच्या वेबसाईटवर हे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

आज (5 सप्टेंबर) शिक्षकदिनानिमित्त उमेश खोसे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हिनाकौसर खान यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद...

Tags: उमेश खोसे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हिनाकौसर खान पिंजार आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल शाळा Teacher Umesh Khose National Teacher Award Heenakausar Khan Pinjar Digital School Load More Tags

Comments:

Hìra

खोसे सरांचे हार्दिक अभिनंदन !मुलाखत मात्र प्रभावशून्य होती. ती अधिक माहितीपूर्ण करता आली असती.

Add Comment