एकोणिसाव्या शतकात महात्मा जोतीराव फुले आणि विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील समाजाची व्यवस्था ढवळून काढणाऱ्या एका विचारप्रवर्तक चळवळीचा प्रारंभ केला. या दोघा महामानवांच्या विचारांतून आणि साहित्यातून प्रेरणा घेऊन जी लेखन चळवळ उभी राहिली तिचा आढावा घेणारा कोश डॉ. महेंद्र भवरे आणि संपादक मंडळ (डॉ. अशोक इंगळे, राम दोतोंडे, डॉ. सुनील अवचार, डॉ.मच्छिंद्र चोरमारे, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. भास्कर पाटील, पंडित कांबळे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे) यांनी 'फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश' या नावाने संपादित केला आहे.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून 2022 पर्यंतच्या कालखंडातील पुरोगामी, प्रागतिक विचारांचे 560 स्त्री-पुरुष लेखक, विचारवंत, वृत्तपत्रांत व नियतकालिकांत या विचारधारेचे वैचारिक लेखन किंवा कथा-कविता इत्यादी लेखन करणारे लेखक, आंबेडकरी जलसेकर व लोकगीतकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर उदयाला आलेली दलित साहित्य चळवळ, समीक्षक, विचारवंत, आधुनिक काळातील लेखक, कवी, नाटककार यांच्याविषयी संदर्भासह नोंदी लिहिलेल्या आहेत. मजकूर अद्ययावत आणि विश्वसनीय असेल, याची खबरदारी घेतली आहे.
त्यांच्या या कामाची व्याप्ती, महत्त्व आणि अनुभव जाणून घेण्यासाठी डॉ. मनोहर जाधव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठीचे निवृत्त प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माजी प्रमुख, कवी आणि समीक्षक) यांनी डॉ. महेंद्र भवरे यांच्याशी संवाद साधला.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही महत्त्वाची मुलाखत (49 मिनिटांचा व्हिडिओ) आम्ही कर्तव्य-साधनावर प्रसिद्ध करत आहोत. आजच्या काळात निर्माण झालेल्या एका महत्त्वाच्या ज्ञानस्रोताच्या निर्मितीची प्रक्रिया आपण आवर्जून ऐकण्यासारखी आहे.
फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश
संपादक : डॉ. महेंद्र भवरे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
मूल्य : ५००० रु.
पृष्ठसंख्या : १४२८
पुस्तक येथे उपलब्ध आहे
Add Comment