लेखकाची सामाजिक बांधिलकी

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची दासू वैद्य यांनी घेतलेली मुलाखत (6/8)

मराठी साहित्य आणि संस्कृती यांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिला जाणारा व सर्वाधिक दखल घेतला जाणारा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उल्लेख करावा लागतो. या वर्षीचे संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर या तालुक्याच्या गावी 22 ते 24 एप्रिल 2022 असे तीन दिवस होत आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांची निवड झालेली आहे. त्यांचे अध्यक्ष होणे मागील आठ वर्षे तरी चर्चेत होते.

भारत सासणे यांची लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय, विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध मात्र पुस्तकरूपाने न आलेले असे लेखन शिल्लक आहे ते वेगळेच आणि अद्यापही त्यांचे लेखन चालू आहे. गेल्या वर्षी ‘दंतकथा’ आणि ‘उघडा दरवाजे उघडा!’ हे सासणे यांनी केलेले अनुवाद साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आलेले आहेत.याशिवाय आणखी काही लेख व कथा त्यांनी साधना साठी लिहिलेल्या आहेत. 2013 मधील ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या साधना विशेषांकात त्यांनी व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘नवरंग’ सिनेमावर लिहिलेला लेख, आणि 2021 मध्ये ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विशेषांकात नाथमाधव यांच्या वीरधवल कादंबरीवर त्यांनी लिहिलेला लेख ही अलीकडच्या त्यांच्या लेखनातली दोन ठळक उदाहरणे.

अशा या भारत सासणे यांची दीर्घ मुलाखत ‘साधना’साठी घ्यावी असे वाटणे साहजिकच होते. थोडेच पण विचारगर्भ लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या दासू वैद्य यांनी सासणे यांची मुलाखत घेतली. तीन-साडेतीन तासाच्या या दीर्घ मुलाखतीत सासणे यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, लेखनप्रवासाविषयी सविस्तर चर्चा आहे. तिचे शब्दांकन साधना साप्ताहिकाच्या 23 एप्रिल 2022च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. मात्र मूळ ध्वनीमुद्रित स्वरूपात असलेली मुलाखत ‘कर्तव्य’वर देता आली तर तिचा दुहेरी उपयोग होऊ शकेल आणि ती वेगळ्या माध्यमातून अधिक लोकांपुढे जाऊ शकेल असा विचार करून ती इथे उपलब्ध करून देतो आहोत. ही दीर्घ मुलाखत आठ भागांत दररोज एक भाग या प्रमाणे सलग आठ दिवस कर्तव्य वरून प्रसिद्ध होईल... त्या मुलाखतीचा हा सहावा भाग.

या भागात सासणे यांनी लेखकाची सामाजिक बांधिलकी आणि मराठीतला समीक्षाव्यवहार यांची चर्चा केली आहे. सामाजिक प्रश्नांसाठी लेखकाने रस्त्यावर उतरायला हवे का? मराठीतली समीक्षा साहित्यकृतीला केंद्रस्थानी ठेवून होते का यावर सासणे यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

Tags: मुलाखत साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष मराठी साहित्यिक मराठी साहित्य उदगीर साहित्यविषयक मुलाखती कविता कादंबरी दासू वैद्य मराठी पुस्तके लेखन सर्जनशीलता ललित साहित्य वाङ्मय Load More Tags

Comments:

Umesh Madhukar kunde

Nice. खुप छान

Add Comment

संबंधित लेख