गरवारे कॉलेज ते कॉर्नेल टेक : शिकणे व शिकवणे

मुक्ती खैरे यांची मुलाखत

प्रिय वाचक, 

पुणे येथील गरवारे महाविद्यालयातून सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, नंतर पुणे विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, त्यानंतर आयआयटी मुंबई येथून व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि मग अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व्यवस्थापनशास्त्रातच पीएचडी, असा शैक्षणिक प्रवास मुक्ती खैरे यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'मध्ये दहा वर्षे अध्यापन केले आणि आता 'कॉर्नेल टेक'मध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत.

शिकणे व शिकवणे हा त्यांचा मागील पाव शतकाचा प्रवास आज-उद्याच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांनाही विशेष मननीय वाटेल. हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. आणि हो, ही संपूर्ण मुलाखत शब्दांकन करून 20 जुलैच्या साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केली आहे, जिज्ञासूंनी ती जरुर वाचावी. Thanks.

- संपादक , साधना

Tags: Mukti Khaire Cornell Tech Education Vinod Shirsath Sadhana Aivaj Interview Load More Tags

Add Comment