आधुनिक समाज निर्माण करण्यासाठी तरुणाईला आवाहन

"मला वचन द्या, लग्नाचा निर्णय घेताना मी जातीचा व धर्माचा विचार करणार नाही!"  

भूमिका व आवाहन

ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ, दक्षिणायन चळवळीचे प्रवर्तक आणि राष्ट्र सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष डॉ गणेश देवी हे गांधी जयंतीचे निमित्त साधून, 2 ते 10 ऑक्टोबर 2019 या काळात उपोषण करणार आहेत. त्यांचे असे आवाहन आहे की, या काळात रोज 100 तरुण-तरुणींनी त्यांना वचन द्यावे, 'आम्ही लग्नाचा निर्णय घेताना जातीचा व धर्माचा विचार करणार नाहीत.'

त्या नऊ दिवसांच्या काळात ज्या दिवशी असे 100 तरुण-तरुणी मिळणार नाहीत, त्या दिवशी गणेश देवी अन्नग्रहण करणार नाहीत.

या संदर्भातील त्यांची भूमिका मांडणारा व आवाहन करणारा हा व्हिडिओ आहे. 

आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी संपर्क:

E-mail: rsd@beyondcaste.com

Mob:7820940519

गुगल फॉर्म ची लिंक: https://forms.gle/U25bdt4uysMYMDoj7

 

Tags: आंतरजातीय विवाह आंतरजातीय व्हिडिओ Load More Tags

Comments:

Chandrashekhar

माननीय गणेश देवी यांना शतशः धन्यवाद ! जातिअंताच्या लढ्यासाठी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा ! पण केवळ शुभेच्छा देऊन चालणार नाही तर प्रत्येकाने याकामी वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होणे व हातभार लावणे गरजेचे आहे . मी निश्चितच आपल्या सोबत आहे.

Add Comment