• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • मुलं आणि पालकांचा वेबदुनियेतील वाटाड्या
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    सामाजिक परिचय

    मुलं आणि पालकांचा वेबदुनियेतील वाटाड्या

    'स्क्रीन टाईम' या पुस्तकाचा परिचय 

    • सानिया भालेराव
    • 04 Dec 2020
    • 0 comments

    आपण स्क्रीनवर काय पाहतो, किती वेळ पाहतो, कशाकरता पाहतो याचं भान आपल्याला असायला हवं. हे भान कशाकरता असायला हवं आणि ते राहिलं नाही तर काय होऊ शकेल हेसुद्धा लेखिका पुस्तकातून अत्यंत सोप्या भाषेत सांगून जातात आणि म्हणून हे पुस्तक वाचनीय तर आहेच... शिवाय ते महत्त्वाचंसुद्धा आहे. 

    नेट पॉझिटिव्ह, शेरेंटीग, राईट टू प्रायव्हसी, डिजिटल फुटप्रिंट्स, स्क्रीन डिपेन्डन्सी या टर्म्स ओळखीच्या वाटत असतील तर... जर तुम्ही मोबाईल किंवा तत्सम कोणतंही गॅजेट वापरत असाल, जर तुम्ही इंटरनेट नावाच्या महाजालाचा एक भाग असाल, जगण्यासाठी हवेप्रमाणेच तुम्हाला वायफायची निकड भासते आणि तुमच्या घरातल्या चिल्लूपिल्लूपासून टीनएजर पोरांपर्यत जर मोबाईलनामक खेळणं पोहोचलं असेल ...तर मुक्ता चैतन्य यांनी लिहिलेलं ‘स्क्रीन टाईम’ हे पुस्तक तुम्ही जरूर वाचायला हवं. 

    स्क्रीन असेलेले वेगवेगळे गॅजेट्स वापरताना मुलांनी आणि पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि टेक्नॉलॉजीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहताना आपलं आयुष्य याच टेक्नॉलॉजीचं गुलाम तर होत नाहीये ना हे कसं चाचपडून पाहिलं पाहिजे याबद्दल लेखिकेनं या पुस्तकात अत्यंत उत्तम आणि अभ्यासपूर्ण शैलीत लिहिलं आहे. 

    जवळपास दहा वर्षांपासून सोशल मिडिया या विषयावर लेखिका काम करत आहेत आणि या पुस्तकाच्या निमित्तानं सर्व पालकांना आणि मुलांना त्या हे सांगू पाहत आहेत की, आपण वापरत असलेल्या गॅजेट्सची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण स्क्रीनवर काय पाहतो, किती वेळ पाहतो, कशाकरता पाहतो याचं भान आपल्याला असायला हवं. हे भान कशाकरता असायला हवं आणि ते राहिलं नाही तर काय होऊ शकेल हेसुद्धा लेखिका पुस्तकातून अत्यंत सोप्या भाषेत सांगून जातात आणि म्हणून हे पुस्तक वाचनीय तर आहेच... शिवाय ते महत्त्वाचंसुद्धा आहे. 

    आपल्या सगळ्यांचंच आयुष्य इतकं गतिमान झालेलं आहे की, खूपदा काय होतं... आपल्या हातांत असलेला मोबाईल हा आपला विरंगुळा ते सवय असा कधी परिवर्तित होतो हे आपल्यालासुद्धा समजत नाही. कित्येकदा अगदी दोनएक वर्षांच्या मुलालासुद्धा मोबाईलवर किंवा स्क्रीनवर यूट्यूब किंवा तत्सम व्हिडिओ लावून दिला जातो आणि मग तो व्हिडिओ पाहता-पाहता त्या छोट्या पोराला जेवायला घालणं वगैरे सुरू होतं. ते पिल्लूसुद्धा डोळे विस्फारून बघत असतं आणि काहीतरी डोळ्यांसमोर असल्याशिवाय खायला तोंड उघडायचं नाही या स्थितीत ते हळूहळू पोहोचतं. वरवर हे साधंसोपं वाटत असलं तरीही ही एक प्रकारची स्क्रीन ॲडिक्शन आहे हे बऱ्याच पालकांना समजत नाही. दुर्दैवानं जेव्हा समजतं तेव्हा उशीर झालेला असतो. 

    मोबाईलसारख्या गॅजेट्सचा सगळ्यात भयानक आणि लक्षात न येणारा साईड इफेक्ट म्हणजे सवय. डोळयांपुढे सतत काहीतरी चालू असणं... मग ते व्हिडिओज्‌ असतील, ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेबसिरीज असतील, वेगवेगळे चॅटिंग ॲप्स असतील, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स असतील नाहीतर गेम्स असतील... स्क्रीनवर दिसणारं हे विश्व बलाढ्य आहे... ते सतत पाहण्याची सवय लागते, मग त्याचं रूपांतर व्यसनात कधी होतं हे आपल्या लक्षातच येत नाही. 

    मुलांना खरंतर या विश्वाच्या दुष्परिणामांची कल्पना नसते आणि कित्येक पालकांनासुद्धा नसते.  ज्यांना ही कल्पना असते ते पालकसुद्धा हे पाहू नको ते करू नको अशी जबरदस्ती मुलांवर करू पाहतात आणि कितीतरी वेळा मुलं यानं अजूनच चेकाळतात. अशा वेळी खरी गरज असते ती गॅजेट्सचा वापर सजगतेनं कसा करायचा हे मुलांना सांगण्याची... आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांनीसुद्धा ही सवय आधी स्वतःला लावून घ्यायला हवी... कारण मुलं अनुकरणातून शिकतात. 

    आपणच जर तासन्‌तास डोकं मोबाईलमध्ये खुपसून बसत असू तर मुलंपण तेच करणार आणि म्हणूनच घरामध्ये स्क्रीन टाईम किती वेळ ठेवायचा, मुलांनी काय बघायचं यावर मोकळेपणानं चर्चा करणं, मुलांना विश्वासात घेऊन संवाद साधत त्यांना सजग करणं, सायबर स्पेसमधल्या वावराबाबत त्यांना जबाबदार असायला शिकवणं हे पालकांनी करणं गरजेचं आहे. 

    आता प्रश्न पडतो की, हे करायचं कसं? तर अशा वेळी ‘स्क्रीन टाईम’ हे पुस्तक आपल्या मदतीला येतं. लेखिकेनं या पुस्तकात दोन विभाग केले आहेत... एक विभाग आहे मुलांसाठी आणि दुसरा पालकांसाठी. आजवर मोठ्यांच्या वेबदुनियेबद्दल बरंच बोललं आणि लिहिलं गेलं आहे... पण लहान मुलांच्या वेबदुनियेबद्दल विशेष असं लिहलं गेलं नाहीये. ही छोटी मुलं या दुनियेमध्ये एकटी आहेत आणि त्यांच्यावर कसलीही जबरदस्ती न करता पालकांनी त्यांना सोबत कशी करायची हे या पुस्तकात फार सोप्या पद्धतीनं उलगडून दाखवलं आहे.  

    विल्यम कामक्वाम्बा, रिचर्ड तुरेरे, अडोरा स्वीटक यांसारख्या लहान मुलांनी इंटरनेटच्या केलेल्या चांगल्या उपयोगांची अनेक सकारात्मक उदाहरणं या पुस्तकात मुलांना वाचायला मिळतात. इंटरनेटला सतत क्रिटिसाईज न करता त्यात चांगलं काय आहे हे फोकस करून मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे या पुस्तकात केलं आहे. 

    सोबतच लेखिकेनं यात ॲक्टिव्ह लिंक्ससुद्धा दिलेल्या आहेत. विशेषकरून इबुक वाचताना एक छान इफेक्ट जाणवतो... म्हणजे अडोरा स्वीटक या सात वर्षांच्या ब्लॉगर मुलीबद्दल आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा तिच्या टेड टॉकच्या व्हिडिओ लिंकवर क्लीक करून तो व्हिडिओ आपण लागलीच पाहू शकतो... त्यामुळं होतं काय... की, जे आपण वाचलेलं असतं, ते त्याच क्षणी हा व्हिडिओ पाहून मनावर अधिक ठसतं आणि हाच प्रत्यय पुस्तकात पुढेही या प्रकारच्या इतर ॲक्टिव्ह लिंक्समुळे येत राहतो... त्यामुळं या पुस्तकाचं इबुक वाचताना अधिक चांगला फील येतो आणि हे नक्कीच या पुस्तकाचं एक वेगळेपण आहे. 

    बॉडीइमेजबद्दल सजगता, गेमिंग चॅलेंजेस्‌मधले धोके, टीनएजमधल्या मुलांचे प्रश्न यांबाबात लेखिका मुलांशी फार सहजतेनं संवाद साधतात. इतकंच नाही तर इंटरनेटवर काय बघू शकता हेही त्या सांगतात. त्यासाठी त्या जुलिअन फ्रेडरिक या छोट्या शेफबद्दल किंवा कुणाला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर ती कुठे शिकता येईल, डू इट युअरसेल्फ म्हणजे डीआयवायचं देखणं जग या पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचवतात. पॉडकास्टबद्दल, घरातल्या शेतीबद्दल जाताजाता सांगून असे वेगवेगळे विषय या पुस्तकामार्फत मुलांपर्यंत पोहोचवतात.  

    पालकांसाठी असेलला भागसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. मुलांना मोबाईल देतानाचे नियम काय असावेत, जेवताना स्क्रीन डोळ्यांसमोर असली की काय दुष्परिणाम होतात, ते कसे टाळावेत, स्क्रीन टाईम किती ठेवावा, गेमिंग ॲडिक्शन, शेरेटींग, राईट टू प्रायव्हसी यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर फार सहजसोप्या भाषेत लेखिका मार्गदर्शन करतात. मला स्वतःला तर हे पुस्तक ‘हॅन्ड्स ऑन गाईड’ वाटलं... म्हणजे पालक म्हणून आपल्याला फार बेसीक प्रश्न पडलेले असतात. 

    काय करायचं हे माहीत असतं... पण ते कसं करायचं हे अनेकदा माहीत नसतं. अशा वेळी हे पुस्तक नक्कीच मदतीला येतं. ‘अरेच्चाऽ हे करून पाहू... हे सोपं आहे...’ असं वाचताना अनेक वेळा आपल्याला जाणवतं आणि हेच या पुस्तकाचं यश आहे. मराठीमध्ये असं पुस्तक येणं ही अत्यंत आशादायक बाब आहे. नेट पॉझिटिव्ह राहून आपण इंटरनेटचा आणि वेबचा कसा सजगतेनं वापर केला पाहिजे, करू शकतो हे या पुस्तकातून लेखिकेनं फार चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे आणि म्हणून हे पुस्तक जास्तीत जास्त पालकांनी आणि मुलांनी वाचायला हवं.
     
    मूळ पुस्तक मराठी भाषेमध्ये असलं तरीही इंग्रजी भाषेत सई बांदेकर आणि रेश्मा मेरानी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे... त्यामुळे या दोनही भाषांमध्ये हे पुस्तक वाचता येणार आहे... तसंच हे पुस्तक इबुक स्वरूपात ॲमेझॉन किंडलवर उपलब्ध आहे. 

    वाहतुकीचे नियम रस्ता क्रॉस करताना आपण आपल्या मुलांना समजावून सांगतो. कोणता दिवा लागला की पुढे जायचं, कोणता दिवा लागला की थांबायचं हे सांगतो. सुरुवातीला त्यांचा हात धरून रस्ता क्रॉस करायला शिकवतो. त्याचप्रमाणे ही वेबदुनिया खूप जादूई असली, सुंदर असली तरी इथे वावरताना त्यांना या जगाचे नियम समजावून सांगणं गरजेचं आहे आणि सोबतच ते स्वतः समजून घेणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. 

    या डार्क वेबमध्ये आपण मुलांना एकटं सोडू शकत नाही आणि कायम त्यांचा हात पकडूनही ठेवू शकत नाही. आपल्याला त्यांना जबाबदार करायचं आहे आणि या जगात वावरण्याची मोकळीकसुद्धा द्यायची आहे. यासाठी ‘स्क्रीन टाईम’ हे पुस्तक तमाम पालकांना आणि मुलांना नक्कीच मदत करेल.   

    - सानिया भालेराव
    saniya.bhalerao@gmail.com


    स्क्रीन टाईम  
    लेखक आणि प्रकाशक : मुक्ता चैतन्य 
    पृष्ठसंख्या : मराठी -140, इंग्लीश - 144
    किंमत : मराठी - 200 रुपये, इंग्लीश - 250 रुपये   

    Tags: मराठी सानिया भालेराव पुस्तक परिचय मुक्ता चैतन्य स्क्रीन टाईम Marathi Saniya Bhalerao Book Introduction Mukta Chaitanya Screen Time Load More Tags

    Add Comment

    संबंधित लेख

    लेख

    महिला आणि संपत्तीतील हक्क 

    स्नेहा भट, सीमा कुलकर्णी, स्वाती सातपुते, पल्लवी हर्षे 19 Dec 2021
    लेख

    ‘दंगल गर्ल’ लीना सिद्दी

    ज्योती भालेराव - बनकर 18 May 2022
    व्हिडिओ

    सिद्दींचे आरक्षण आणि स्पेशल एरिया गेम प्रोग्रॅम

    मार्गारेट अल्वा 17 May 2022
    व्हिडिओ

    सिद्दींचे खेळातील महत्त्व

    प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव-बनकर, सूरज निर्मळे, चंदनसिंग 15 May 2022
    लेख

    पर्यायी मिडिया!

    दिलीप लाठी 02 Jan 2023

    लेखकाचे इतर लेख

    लेख

    मूलभूत संशोधन करूनही श्रेयापासून वंचित राहिलेल्या तीन महिला...

    सानिया भालेराव
    28 Feb 2021
    परिचय

    मुलं आणि पालकांचा वेबदुनियेतील वाटाड्या

    सानिया भालेराव
    04 Dec 2020
    लेख

    द अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक

    सानिया भालेराव
    15 Oct 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....