गोव्याच्या निसर्गाची विविध रूपं, भारतीय आणि पोर्तुगीज संस्कृतीच्या मिलाफातून घडलेल्या मिश्र शैलीतील वास्तु, तिथलं लोकजीवन, खाद्य संस्कृती अशा अनेक घटकांचा अविष्कार घडवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात गोव्यातील वागातोर येथील 'उज्ज्वल आर्ट गॅलरी'मध्ये होते आहे. मुंबई येथील चित्रकार तुषार शेट्टी आणि जयदीप शेट्टी यांच्या चित्रांचे हे प्रदर्शन आहे. पेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या तुषार यांनी स्वतःच्या आवडीपोटी चित्रकला जोपासली आहे. विशेषतः जलरंग माध्यमात त्यांचा हातखंडा आहे. या प्रदर्शनात ठेवल्या जाणाऱ्या चित्रांपैकीच काही चित्रे (तुषार यांनीच लिहिलेल्या इंग्रजीतील कॅप्शन्ससह) असणारे 'गोवन डिलाइट्स' नावाचे पुस्तकही त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. उद्यापासून सुरू होणारे चित्रांचे प्रदर्शन आणि नुकतेच आलेले हे पुस्तक यानिमित्ताने तुषार यांच्याशी साधलेला संवाद..
Tags: Tushar Shetty Goan Delights Vinod Shirsath Painting Goa Tourism Load More Tags
Add Comment