"पाठांतर ही स्मृतीची एक कसरत आहे, तर अवधान हे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. आजचे शिक्षण जड आहे; नवशिक्षण हे गतिशील असेल आणि ते शोधनाची वृत्ती जोपासेल. अशा शिक्षणात आजच्या पद्धतीच्या परीक्षांना स्थानच असणार नाही. शिक्षक शिकवण्याचा उद्योग न करता जिज्ञासा जागवण्याचे कार्य करतील. अशा वातावरणात परस्परांच्या विचारांना चालना मिळेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या स्मृतीला तजेला आणण्याऐवजी त्यांना जीवनाची दृष्टी लाभण्याला मदत होईल. आजच्या उच्चनीचतेच्या कल्पनांनी डागाळलेल्या वर्णधारी शिक्षण व्यवस्थेच्या जागी नवी व्यवस्था आणावी लागेल. याचा अर्थ एखाद्या तयार साच्यात स्वतःला कोंबण्याचा खटाटोप सोडून द्यावा लागेल." - यदुनाथ थत्ते
'अॅन एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन' या पॅरागॉन पब्लिकेशन ट्रस्ट द्वारे प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला लेख 'शिक्षणासंबंधी नवी दृष्टी' या नावाने 'साधना'च्या 1978 च्या 11 मार्च आणि 18 मार्चच्या अंकांमध्ये दोन भागांत प्रसिद्ध झाला होता. ज्या पुस्तकाच्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला ते आता अत्यंत दुर्मिळ झाले आहे. मात्र तत्कालीन शिक्षण व्यवस्थेची मूलभूत चिकित्सा करणारा आणि तिच्यामध्ये कोणती नवी मूल्ये रुजवता येतील याची चर्चा करणारा यदुनाथांचा हा लेख आजही कालसुसंगत वाटावा असाच आहे. अर्थात, आपल्या शिक्षण व्यवस्थेमागची मूल्यात्मक चौकट आज इतक्या वर्षांनंतरही फारच कमी प्रमाणात बदललेली आहे हे वास्तवही यातून अधोरेखित होते! आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा लेख 'कर्तव्य साधना'वरून ऑडिओ स्वरूपात प्रसिद्ध करत आहोत. मूळ लेख साधना साप्ताहिकाच्या अर्काइव्हवर उपलब्ध आहे.
Tags: शिक्षण साधना अर्काइव्ह ऑडिओ मूल्यशिक्षण विद्यार्थी शिक्षक दिन साहित्य वाचन शिक्षणविषयक साहित्य Load More Tags
Add Comment