ऑडिओ - मित्रभूषण पं. भीमसेन जोशी

भीमसेनजींच्या जन्मशताब्दिवर्षाच्या समाप्तीनिमित्ताने...

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दिवर्षाची सांगता 4 फेब्रुवारी 2020 रोजी होते आहे. 4 फेब्रुवारी 1922 ते 24 फेब्रुवारी 2011 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भीमसेनजींनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एक मोठा काळ गाजवला आहे. सवाई गंधर्वांकडून किराणा घराण्याची तालीम त्यांनी घेतली, मात्र स्वतःला भावलेल्या इतरही अनेक ज्येष्ठ गायकांच्या संगीतातील गुणवैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली आणि स्वतंत्र शैली घडवली. ख्यालासह ठुमरी, अभंग, नाट्यपदे, सिनेगीते अशा विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली आहे. 'साधना'चे भूतपूर्व संपादक, कवी वसंत बापट हे भीमसेनजींच्या निकटवर्तीयांपैकी. भीमसेनजींच्या 'अभंगवाणी' या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी वसंत बापट अनेकदा निरुपण करत असत. 

भीमसेनजींच्या जन्मशताब्दिवर्षाच्या समाप्तीनिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 2003 च्या दिवाळी अंकातील 'मित्रभूषण पं. भीमसेन जोशी' हा लेख ऑडिओ स्वरूपात पुन्हा भेटीला आणतो आहोत. साहित्य-संगीताचे मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी यांचा हा लेख, त्यांच्या आणि भीमसेनजींच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत भीमसेनजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनवट पैलू उलगडणारा आहे. 50 मिनिटांच्या या ऑडिओसाठी सुहास पाटील यांनी अभिवाचन केले आहे.


साधना साप्ताहिकाच्या अर्काइव्हवरील 'मित्रभूषण पं. भीमसेन जोशी'  वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 


हेही वाचा : 

अमृताचे डोहीं अमृततरंग - वसंत बापट
भारतीय संगीताचा मानदंड : पंडित भीमसेन जोशी - श्रीराम पुजारी 
बहुजनगायक - विनय हर्डीकर  

Tags: साधना अर्काइव्ह श्रीराम पुजारी भारतीय शास्त्रीय संगीत सवाई गंधर्व महोत्सव किराणा घराणे Load More Tags

Add Comment