कुमार : एक प्रश्नचिन्ह? छे, उद्गारचिन्ह!

पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीवर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने..

भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रतिभावान गायक पं. कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी उद्या (8 एप्रिल 2023) पासून सुरु होते आहे. 8 एप्रिल 1924 ते 12 जानेवारी 1992 असे 68 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. प्रख्यात कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले साधनाचे भूतपूर्व संपादक वसंत बापट आणि कुमारांचा स्नेहसंबंध होता. त्यामुळे, कुमारांचे निधन झाले तेव्हा साधनाने त्यांना श्रद्धांजली म्हणून 12 पानी विशेषांक काढला होता. तत्पूर्वीही कुमारांच्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली तेव्हा साधनाने त्यांच्यावर गौरव विशेषांक काढलेला होता. या दोन्ही विशेषांकातील निवडक तीन लेख (वसंत बापट, रामकृष्ण बाक्रे आणि वा. ह. देशपांडे यांचे) कुमारांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने ऑडिओ स्वरूपात आणत आहोत. मात्र हे दोन्ही संपूर्ण विशेषांक साधनाच्या अर्काइव्हवर उपलब्ध आहेत. या तीनही लेखांचे वाचन सुहास पाटील यांनी केले आहे.

रामकृष्ण बाक्रे यांचा हा लेख कुमारांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त काढलेल्या गौरव विशेषांकातून घेतला आहे.


हेही पाहा : 
पं. कुमार गंधर्व गौरव विशेषांक : 05 एप्रिल 1984

कुमार गंधर्वांना श्रद्धांजली (पुरवणी अंक) : 18 जानेवारी 1992

Tags: vocal kumargandhrva birth centenary कुमार गंधर्व जन्मशताब्दी भारतीय शास्त्रीय संगीत उत्तर हिंदुस्थानी संगीत स्मृतीलेख nirguni bhajan sunta guru gyani Load More Tags

Add Comment