छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन व कार्य गेली साडेतीन शतकं जनमानसांत स्फुर्तिदायी व प्रेरणादायी राहिलेले आहे. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 40 वर्षांपूर्वी नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला 'पराभव शिवाजी राजांचे' हा लेख अंशतः संपादित करुन ऑडीओ स्वरुपात सादर करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यातील महत्वाच्या घटना, घडामोडी यांचा वेध घेऊन त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने समोर ठेवण्याचा प्रयत्न कुरुंदकरांनी या लेखातून केला आहे. राजकीय व सामाजिक जीवनावर तर्कशुद्ध विश्लेषण करुन मर्मभेदी भाष्य करणारे कुरुंदकर प्रत्येक तरुण पिढीला आपले वाटतात.ऑडिओ स्वरूपातील हा लेखही नवे आयाम पुढे करुन श्रोत्यांना नवी दृष्टी देईल.
मूळ लेख: पराभव शिवाजी राजांचे
लेखक: नरहर कुरुंदकर
पुस्तक: निवडक नरहर कुरुंदकर- व्यक्तिवेध: खंड 1
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी
Tags: Kurundkar Shivaji Maharaj Chatrapati on Speech Audio नरहर कुरुंदकर शिवाजी महाराज छत्रपती ऑडीओ नरहर कुरुंदकर narhar kurundkar shivaji maharaj शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास कर्तव्य साधना Load More Tags
Add Comment