कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? 

तीन भागांच्या मालिकेतील दुसरा भाग 

आधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. तो भाग इथे ऐकता येईल. या दुसऱ्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे? 

Tags: कर्तव्य पॉडकास्ट पॉडकास्ट देवकुमार अहिरे प्रियांका तुपे इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष इस्राईल पॅलेस्टाईन ज्यू मुस्लीम अमेरिका इतिहास कथन दृष्टीकोन Podcast Devkumar Ahire Priyanka Tupe Israel Palestine Jew Muslim America History Israel - Palestine Conflict Narrative एडवर्ड सैद Edward Said Load More Tags

Comments:

Anand Pawar

कथनाचे राजकारण, कालावधी, निर्मिती आणि consumption हे मुद्दे देवने मुद्देसूदपणे मांडले. मुस्लिम brotherhood चा मुद्दा स्पर्शाला गेला हे महत्वाचे. इस्राईल आणि palestine चे geo-पोलिटिकल लोकेशन, त्याचा जागतिक व्यापाराशी असलेला संबंध हे देखील मुद्दे मागील 4 दशकांमध्ये palestine ची बाजू मांडण्यामध्ये महत्वाचे ठरतात. पलेस्टेनिअन narrative मंडण्यामध्ये यासर आराफत यांचे प्रयत्न आणि योगदान याचा देवला विसर पडलेला दिसतोय. जगभर palestine चे एक महत्त्वाचे narrative त्यांच्या मुळे मांडले गेले हे विसरून चालणार नाही.

SHIVAJI PITALEWAD

Thank you so much! हा विषय सोपा करुन समजून दिलात याबद्दल आपले आभार कथन या किंवा त्या बाजूचे... ते कसं पसरवलं जात आपण कशी भूमिका घेतली पाहिजे इ.गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजले.

Add Comment