काळ पुढे पुढे जातो आहे, सभोवतालच्या परिस्थितीत अधिकाधिक तणाव निर्माण होताहेत, सर्वच घटकांच्या आशा - अपेक्षा - आकांक्षा मोठया प्रमाणात वाढताहेत... आणि या प्रक्रियेत, सर्वच घटक सर्वांत मोठा आधार म्हणून भारतीय संविधानाकडे पाहात आहेत. म्हणून, भारतीय नागरिकांचे त्या संदर्भातील आकलन अधिकाधिक वस्तुनिष्ठ होत जाणे आवश्यक आहे. हा 75 मिनिटांचा पॉडकास्ट त्यासाठी काही अंशी उपयुक्त ठरेल, आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे संविधानाविषयी जास्त जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न करेल. प्रा. डॉ. प्रताप सिंह साळुंके यांच्याशी हा संवाद साधला आहे विनोद शिरसाठ, मृदगंधा दीक्षित, समीर शेख यांनी, तर याचे रेकॉर्डिंग आणि एडिटिंग केले आहे सुहास पाटील यांनी...
Tags: ऑडिओ पॉडकास्ट भारतीय संविधान संविधान उद्देशिका प्रजासत्ताक दिन प्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंखे Kartavya Podcast Indian Constitution Preamble Prof Dr Pratap S Salunkhe Republic Day Load More Tags
Add Comment