23 एप्रिल हा विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस जागतिक ग्रंथ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने लेखक मुकुंद टाकसाळे यांच्याशी 'सेंट्रल पॉईंट'च्या या दुसऱ्या भागात 'कर्तव्यसाधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांनी पाऊण तास संवाद साधला आहे. समाजजीवनातील विसंगती पकडणे आणि त्यावर मार्मिक टीका-टिप्पणी व भाष्य करणे हे कोणत्याही विनोदी लेखकाचे प्रमुख वैशिष्ट्य असते. आणि टाकसाळे हे तर गंभीर विनोदी लेखनासाठी ओळखले जातात, शिवाय त्यांचें वाचन प्रामुख्याने ललित-वैचारिक स्वरुपाचेच राहिले आहे. त्यामुळे त्यांचे स्वतःचे वाचन आणि वाचन या विषयाचे त्यांचे आकलन याला वेगळे महत्व आहे.
Tags: marathi literature world book day willam shakespear mukund taksale vinod shirsath विनोद शिरसाठ मुलाखत सेन्ट्रल पॉईंट व्हिडिओ मुलाखत विनोदी लेखन Load More Tags
Add Comment