‘कुमार स्वर : एक गंधर्व कथा’साठी चित्रे काढताना...

चंद्रमोहन कुलकर्णी यांची वंदना भागवत यांनी घेतलेली मुलाखत

कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्या निमित्ताने ‘कुमार स्वर एक गंधर्व कथा’ हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे यांच्याकडून आले आहे. पुस्तकाचे लेखन माधुरी पुरंदरे यांनी केले आहे, तर पुस्तकासाठी बहुरंगी चित्रे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढली आहेत. त्या निमित्ताने, त्या दोघांच्या स्वतंत्र मुलाखती यंदाच्या साधना दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी चंद्रमोहन कुलकर्णी यांची मुलाखत साधनाच्या स्टुडिओमध्ये वंदना भागवत यांनी घेतली. कुमारवयीन वाचकांना कुमार गंधर्वांची गोष्ट सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या पुस्तकातील चित्रांमागचा विचार आणि त्यांची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्यासाठी चंद्रमोहन यांची ही मुलाखत पाहायला-ऐकायला हवी.


साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटवर ही मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

 

Tags: चित्रकला पंडीत कुमार गंधर्व माधुरी पुरंदरे कलापिनी कोमकली देवास ज्योत्स्ना प्रकाशन कुमारवयीन मुलांसाठी पुस्तके शिक्षण संगीत भारतीय शास्त्रीय संगीत मुलाखत व्हिडिओ साधना डिजिटल sadhana digital chandramohan kulkarni kumar gandharva kalapini komkali vandana bhagwat Load More Tags

Add Comment