बिहार विधानसभा निवडणूक 2020 : विशेष लेखमाला 

बिहार विधानसभा निवडणूक 2020 निमित्त 10 ते 12 लेखांची मालिका कर्तव्य साधना वरून प्रसिद्ध करीत आहोत. पुढील महिनाभर प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन लेख प्रसिद्ध होत राहतील. त्यामध्ये, बिहारच्या राजकारणात गेली चार दशके लालू प्रसाद यादव, शरद यादव, नीतिश कुमार आणि रामविलास पासवान या चार व्यक्तिमत्त्वांनी जो ठसा उमटवला त्याचा वेध घेतला जाणार आहे. शिवाय, मागासलेपणा आणि स्थलांतर, सु-शासनाची 15 वर्षे, लोककल्याणकारी योजनांचा प्रभाव, आघाड्यांचे राजकारण, मंडलनंतरचे ओबीसी राजकारण, प्रसारमाध्यमांची भूमिका आदी विषयांवरील लेखही प्रसिद्ध करणार आहोत. ‘द युनिक फाऊंडेशन’ची संशोधक टीम, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील (राज्यशास्त्र विभाग) प्राध्यापक व संशोधक, आणि काही पत्रकार प्रस्तुत लेखमालेसाठी योगदान देणार आहेत. या लेखमालेचे स्वागत होईल अशी आशा आहे.

या लेखमालेत प्रसिद्ध होणारे लेख बिहार विधानसभा निवडणूक - 2020 या लिंकवर क्लिक करून पाहता येतील.

- संपादक,
कर्तव्य साधना.