थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान

26 फेब्रुवारी 2026 या पहिल्या विरामचिन्हे दिवसानिमित्त व्याख्यान

दोन तासांचा व्हिडिओ

26 फेब्रुवारी 2026 पासून मेजर थॉमस कँडी यांचे 150 वे स्मृतीवर्ष सुरू झाले, त्यानिमित्ताने साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांनी व्याख्यान आयोजित केले होते.

विषय : थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान

व्याख्याते : प्रदीप कर्णिक (माजी संचालक, मराठी संशोधन मंडळ, मुंबई)

अध्यक्ष : राजा दीक्षित (माजी अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई)

वेळ : गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026, सायंकाळी 6 ते 8

स्थळ : एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचा हॉल, नवी पेठ, पुणे


13 डिसेंबर 1804 ते 26 फेब्रुवारी 1877 असे 72 वर्षांचे आयुष्य थॉमस कँडी यांना लाभले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते सैनिक म्हणून भारतात आले, वयाच्या 22 व्या वर्षी मराठी - इंग्रजी शब्दकोश तयार करण्याच्या निमित्ताने मोल्सवर्थ यांच्याशी जोडले गेले. त्यानंतर पुढील पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहून शब्दकोश, भाषांतर, मराठी लेखन व संपादन, व्याकरण या संदर्भात ते कार्यरत राहिले. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला आणि तिथेच त्यांचे दफन करण्यात आले. 'युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास' या विषयावरील पीएच. डी. प्रबंधात श्री.म. पिंगे यांनी कँडी यांच्यावर दीर्घ प्रकरण लिहिले आहे, त्या प्रबंधाचे पुस्तक मराठी भाषेच्या संदर्भात विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्या पिंगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थही हे व्याख्यान आयोजित केले जात आहे.


आवाहन :

26 फेब्रुवारी हा 'विरामचिन्हे दिवस' म्हणून साजरा करा...!

मराठीत विरामचिन्हाची खऱ्या अर्थाने सुरुवात कँडी यांनी केली असे मानले जाते, त्यांनी लिहिलेली 'विरामचिन्हाची परिभाषा' ही छोटी पुस्तिका 1850 मध्ये प्रकाशित झाली, त्याला आता 175 वर्षे झाली आहेत. त्यामुळे, 26 फेब्रुवारी हा कँडी यांचा स्मृतीदिवस या वर्षी आणि यापुढे दर वर्षी मराठी भाषकांनी 'विरामचिन्हे दिवस' म्हणून साजरा करावा. तसे आवाहन विविध साहित्य संस्थांना आणि विविध विद्यापीठांच्या मराठी विभागांना करीत आहोत आणि अर्थातच शाळा महाविद्यालयांनाही ! गेल्या अनेक वर्षांपासून 27 फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' तर 28 फेब्रुवारी हा 'भारतीय विज्ञान दिवस' साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, यापुढे 26 फेब्रुवारी हा मराठी विरामचिन्हे दिवस साजरा करण्याची परंपरा रुजवणे औचित्यपूर्ण होईल...!

Tags: विरामचिन्हे दिवस विरामचिन्हे थॉमस कँडी मराठी लेखन इतिहास भाषाव्याकरण ब्रिटिश काळातील शिक्षण Load More Tags

Add Comment