प्रतिक पुरी यांच्याशी संवाद 

ओवीबद्ध पोथीच्या फॉर्ममध्ये लिहिलेल्या पाखंडखंडण या कादंबरीच्या निमित्ताने सुकल्प कारंजेकर यांनी लेखकाशी संवाद साधला आहे..

पाखंडखंडण ही प्रतिक पुरी यांनी लिहिलेली कादंबरी गेल्या महिन्यात गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केली आहे. या कादंबरी लेखनासाठी निवडलेला फॉर्म पोथीचा आहे. देवळांमध्ये ओवीबद्ध पोथी वाचणे आणि फोड करून सांगणे, हा प्रकार पूर्वी तर सर्वत्र होताच; पण आजही ग्रामीण भागात, विशेषतः लहान गावात पोथी सांगितली जाते, ऐकली जाते. त्याच शैलीमध्ये वाचता/सांगता येईल, ऐकता येईल अशी ही पाखंडखंडण आहे; मात्र ही पोथी आधुनिक भारतातील  2014 नंतरच्या कालखंडाची आहे.

जेमतेम दोनशे पानांच्या या पोथीमध्ये 12 अध्याय आहेत. अर्थातच, तिच्यातील व्यक्ती, घटना आणि विचार हे सर्वच आधुनिक आहे. त्या निमित्ताने, प्रतिक पुरी यांची सुकल्प कारंजेकर यांनी घेतलेली ही 32 मिनिटांची व्हिडिओ मुलाखत 'कर्तव्य साधना'वरून प्रसिद्ध करीत आहोत. या मुलाखतीचे शब्दांकन साधना साप्ताहिकातून मार्च 2024 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या अंकात प्रसिद्ध होईल.

Tags: marathi books literature pakhand khandan narendra dabholkar sadhana digital video interview Load More Tags

Comments:

सुशील धसकटे

मुलाखत चांगली झाली आहे. कोणताही आडपडदा न ठेवता समकालीन वास्तवाबद्दल प्रतीक थेट बोलला आहे.

Add Comment

संबंधित लेख