बापटांनी बाभळीचा निबर निसर्ग प्रथमच कवितेत आणला..

वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य या चर्चासत्रातील 'बापट यांच्या कवितेतील विविधता' या विषयावरील भाषण

साधना साप्ताहिकाचे भूतपूर्व संपादक कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधना ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑक्टोबर 2023 ला एस. एम. जोशी फाउंडेशन, पुणे येथे दिवसभराचे चर्चासत्र झाले. 'वसंत बापट : व्यक्ती आणि साहित्य' या विषयावरचे हे चर्चासत्र होते. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत झालेल्या या चर्चासत्रातील चार सत्रांमध्ये एकूण 15 वक्त्यांनी बापट आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. या चर्चासत्राचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग 'साधना'च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेच; मात्र त्यातील निवडक भाषणे स्वतंत्र व्हिडिओच्या स्वरूपात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत.

या चर्चासत्रातील पहिल्या सत्राचा विषय होता, 'बापट यांची कविता'. या सत्रामध्ये शेतकरी कवी म्हणून ओळखले जाणारे इंद्रजीत भालेराव यांनी 'बापट यांच्या कवितेतील विविधता' या विषयावर भाषण केले. 'कुणाला वाटतं, कवीने बाहेरचंच ऐकावं, कुणाला वाटतं- कवीने आतलंच ऐकावं. पण कोणताही प्रामाणिक कवी बाहेरच्या आणि आतल्या हाकांना सारखाच प्रतिसाद देत असतो. बापट आयुष्यभर तेच करत आले. त्यांची कविता शताब्दीपर्यंत येऊन पोहोचलेलीच आहे. आणखीही पुढे काही दिवस ती नक्कीच लोकांच्या स्मरणात राहील आणि मराठी वाङ्‌मयाच्या इतिहासात तर तिचे स्थान महत्त्वाचेच असणार आहे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.


या संपूर्ण चर्चासत्राचा सविस्तर वृतांत येथे वाचा.

Tags: कविता वसंत बापट निसर्ग कविता मराठी साहित्य चर्चासत्र कवितासंग्रह इंद्रजीत भालेराव बाभूळझाड बापटांच्या कवितेतील विविधता vasant bapat babhulzad Load More Tags

Add Comment

संबंधित लेख