अंध मुलांसाठीच्या तीन शाळा

व्हिडिओ मुलाखत 3/3

साधना साप्ताहिकाच्या वतीने 2023 मध्ये पाच तरुणांना तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती, तर पाच तरुणांना यदुनाथ थत्ते अभ्यासवृत्ती प्रदान केली होती. प्रत्येकाने एकेक टॉपिक निवडून , त्यावर पुढील सहा महिने फील्ड वर्क व लायब्ररी वर्क करावे आणि एक दीर्घ दीर्घ लेख लिहावा,अशी ती योजना होती. त्यासाठी त्या सर्वांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले गेले होते. 

त्या अभ्यासवृत्तीतून तयार झालेले तीन विशेष महत्वाचे लेख असलेला साधना साप्ताहिकाचा 12 जानेवारी 2024 चा विशेषांक ( युवक दिनाच्या निमित्ताने ) प्रकाशित  झाला होता. ते तीन युवा अभ्यासक म्हणजे विवेक वाघे, विकास वाळके व प्रतीक राऊत. तो विशेषांक प्रकाशित झाल्यावर, त्या तीनही युवांच्या  प्रत्येकी अर्धा तासाच्या व्हिडिओ मुलाखती कर्तव्य साधनाचे सहसंपादक सुहास पाटील यांनी घेतल्या होत्या.

त्यातील प्रतीक राऊत या तरुणाची मुलाखत आज प्रसिद्ध करीत आहोत. त्याच्या अभ्यासाचा विषय होता, अंध मुलांच्या तीन शाळा. ही 27 मिनिटांची व्हिडिओ मुलाखत पाहिल्यावर / ऐकल्यावर , त्याचा तो लेख मुळापासून वाचण्याची इच्छा झाली तर या लिंकवर क्लिक करा: अंध मुलांसाठीच्या तीन शाळा

- संपादक, साधना
kartavyasadhana@gmail.com 

Tags: pratik raut fellowship blind-school andha shala Load More Tags

Add Comment