मी कुठल्याही सिस्टीममध्ये बसणारी साहित्यिक नाही

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची मुलाखत (2/2)

साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेतील नवी मुलाखत

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर असणार आहेत. त्यांची वैचारिक आणि साहित्यिक वाटचाल जाणून घेण्यासाठी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यांची दीर्घ व्हिडिओ मुलाखत घेतली आहे. 

प्रत्येकी एक तासाच्या दोन भागांत ही मुलाखत साहित्य संमेलनाच्या प्रारंभापूर्वी सलग दोन दिवस प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हा दुसरा भाग आहे. या मुलाखतीचे शब्दांकन करून ती साधना साप्ताहिकाच्या 22 फेब्रुवारी 2025 च्या अंकात प्रसिद्ध केली आहे. लवकरच साधना साप्ताहिकाच्या डिजिटल आर्काईव्हवरदेखील उपलब्ध होईल.

हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. छापील मुलाखत साधना साप्ताहिकाच्या वेबसाईट वर जाऊन वाचू शकता.

- संपादक, साधना

Tags: तारा भवाळकर साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली संमेलन Load More Tags

Comments:

शैलजा पांडुरंग टिळे

ताराबाई भवाळकर यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी अतिशय सारगर्भित मुलाखत. खूप मौलिक उपक्रम आहे. साधना परिवार, डॉ. तारा भवाळकर, डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मनापासून आभार !

नम्रता

खुप छान मुलाखत. तारा भवाळकर यांचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी हार्दिक अभिनंदन.

Add Comment

संबंधित लेख