
'आजचे मास्टर्स' या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा - क्षणचित्रे
मीना कर्णिक गेली साडेतीन दशके सिनेमाविषयक पत्रकारिता, समीक्षा आणि प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षण करत आहेत. स्वतंत्र दृष्टीकोन आणि ठाम भूमिका घेऊन सामान्य माणसाच्या समस्या आणि संघर्षाच्या गोष्टी सांगणाऱ्या, कमी बजेटमध्येही अधिक प्रभावशाली चित्रपट बनवणाऱ्या जगभरातल्या दिग्दर्शकांनी त्यांच्यावर काय आणि किती परिणाम केला हे केवळ एक समीक्षक म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही वाचकांना सांगावं, या भावनेने त्यांनी लिहिलेले आजचे मास्टर्स (जगभरातील आठ दिग्दर्शकांची ओळख) हे पुस्तक साधना प्रकाशानातर्फे शनिवार, 10 मे 2025 रोजी, सायंकाळी 6 वाजता पुण्यातील एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात प्रकाशित होत आहे. त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे प्रसिद्ध करत आहोत.

साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.