साधना बालकुमार व युवा दिवाळी अंक 2021 चे प्रकाशन

साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंक 2021 व युवा दिवाळी अंक 2021चे 15 ऑक्टोबर 2021रोजी प्रकाशन. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, मनोविकास प्रकाशाचे अरविंद पाटकर, डायमंड प्रकाशनाचे दत्तत्रय पाष्टे, प्रकल्प व्यवस्थापक गोपाल नेवे आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या उपस्थित या दोन्ही दिवाळी अंकांचे प्रकाशन झाले. यावेळी साधना कार्यालयातील सहकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.