वाचन जागर महोत्सव 2021 चे उद्घाटन

महाराष्ट्रातील अकरा नामवंत मराठी प्रकाशकांनी एकत्र येत सुरु केलेल्या 'वाचन जागर महोत्सव 2021' चे उद्घाटन 15 ऑक्टोबर 2021 रोजी साधना मिडिया सेंटर, पुणे येथे झाले. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी यावेळी मनोविकास प्रकाशाचे अरविंद पाटकर, डायमंड प्रकाशनाचे दत्तत्रय पाष्टे, साधना प्रकाशाचे विनोद शिरसाठ आणि साधना कार्यालयातील सहकारी उपस्थित होते.