साधना युवा दिवाळी अंक 2021 

74 वर्षांची परंपरा असलेल्या साधना साप्ताहिकाच्या वतीने मागील आठ वर्षांपासून दरवर्षी युवा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. या वर्षीच्या अंकासाठी विविध क्षेत्रांतील सहा कर्तबगार तरुणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. प्रशासन, पत्रकारिता, क्रीडा, चित्रपट, शेती आणि कृषी उद्योग अशा सहा क्षेत्रांतील हे तरुण-तरुणी आहेत. या सर्व मुलाखती कमालीच्या वाचनीय आहेत. त्यातून ठळकपणे पुढे आलेली काही वैशिष्टे खूपच आशादायी म्हणावीत अशी आहेत. आपला सभोवताल कसाही आणि कितीही प्रतिकूल असला तरी पुढे पुढे जात राहण्यासाठी वाव निश्चितच असतो आणि कितीही वाटावळणे व खाचखळगे आले तरी यशस्वी वाटचाल करता येते. म्हणजे एक दुर्दम्य आशावाद जागवणाऱ्या या मुलाखती आहेत. 
- संपादक, साधना

'साधना युवा दिवाळी अंक 2021' अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा.