मुस्लीम सत्यशोधक मंडळाची पन्नास वर्षे

मुस्लीम समाजातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेला 22 मार्च, 2020 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात मंडळाने जुबानी तलाक, बहुपत्नीत्व यांसारख्या परंपरांना विरोध केला, तसेच समान नागरी कायद्याचा आग्रह धरला. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जुबानी तीन तलाकवर बंदी घातली आणि मंडळाने पन्नास वर्षांपूर्वी सुरु केलेल्या सुधारणेचा एक टप्पा यशस्वीपणे पार झाला.