'सीएए-एनआरसी' च्या विरोधात पुण्यातही शाहीनबाग

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) या कायद्यांच्या विरोधात पुण्यातील कोंढवा परिसरात 10 जानेवारीपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे स्वरूप दिल्लीतील शाहीनबाग परिसरात महिलांनी सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनासारखेच आहे. त्यामुळे त्याला 'पुणे का शाहीनबाग' असेही म्हटले जात आहे. या आंदोलनाची ही क्षणचित्रे टिपली आहेत सुरज निर्माळे यांनी.