पुस्तक प्रकाशन : मंच

डॅनियल फ्रान्सिस मस्करणीस यांच्या मंच या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ २५ जानेवारी २०२० रोजी वसई येथे पार पडला. ज्येष्ठ पत्रकार, संपादक व राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे आयोजन, जीवन विकास मंडळ, ठाणे व साधना प्रकाशन यांनी केले होते. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर 'धर्म आणि विवेक' या विषयावर कुमार केतकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, जीविकाचे प्रमुख विश्वस्त सिल्वेस्टर परेरा, अध्यक्ष नेल्सन दोडती व अन्य मान्यवर उपस्थित होते.