लुई फिशर लिखित 'महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

लुई फिशर लिखित 'महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ' या पुस्तकाचे प्रकाशन 1 सप्टेंबर 2019 रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झाले. जेष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी व्यासपीठावर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, पुस्तकाचे अनुवादक वि. रा. जोगळेकर, वसंतराव आपटे व साधना ट्रस्टचे विश्वस्त हेमंत नाईकनवरे उपस्थित होते.